जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आधी डोळ्यात मिरची पावडर टाकली अन् धारदार शस्त्राने केले वार #murder


खुनाचा आरोप असलेल्या युवकाची धारदार शस्त्राने हत्या
चंद्रपूर:- घुग्घुस येथील बँक ऑफ इंडियाजवळ एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. शनिवार 19 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कादीर शेख (25) असे मृताचे नाव आहे. शेख यांच्या डोळ्यात मिरची टाकून हल्ला करण्यात आला, या घटनेनंतर आरोपींनी मृतकाच्या चारचाकी वाहनाला आग लावली. खुनाच्या आरोपाखाली काही दिवसांपूर्वी मृतक हा कारागृहातुन जामिनावर बाहेर आला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक हत्या ५ व ६ तरुणांनी केली असे म्हटले जात आहे. बँक ऑफ इंडियाजवळ कादीर शेखची काही तरुणांशी बाचाबाची झाली. आता कादीर शेखचा खून झाल्यामुळे त्याला जुन्या भांडणाची जोड दिली जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा असून पोलीस या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत.
वृत्त लिहेपर्यंत या हत्येमागील नेमके कारण व आरोपींची नावे समजू शकलेली नाहीत. या हत्याकांडामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत