Top News

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य युवा स्पर्धा परीक्षा व जिवन कौशल्य कार्यक्रम संपन्न #pombhurna


नेहरू युवा केंद्र चंद्रपूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस युवा मंडळ व स्वामी विवेकानंद युवा मंडळ जामतुकुम यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन
पोंभुर्णा:- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस युवा मंडळ व स्वामी विवेकानंद युवा मंडळ जामतुकुम यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक सभागृह जामतुकुम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त युवा स्पर्धा परीक्षा व जिवन कौशल्य कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अधक्ष्य ग्राम. पं. जामतुकूमचे सरपंच भालचंद्र बोधलकर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा चे प्राध्यापक नितीन उपर्वट, प्रमुख पाहुणे विजय बुधे, ग्राम पंचायत चे सदस्य विकास गोवार्धने, अंजना भलवे सदस्य ग्रा. पं.जामतुकम, मंगल मडावी रोखपाल ग्रामीण बँक राजुरा, पुरुषोत्तम पिपळे सदस्य, शाळा सुधार समिती जामतुकम, जिल्हा उच्च प्राथमिक शाळा पोंभूर्णा चे मुखधापक रोहिदास कातकर, नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे तालुका प्रतिनिधी आशिष उराडे, स्वामी विवेकानंद युवा मंडळ जामतुकुम चे अध्यक्ष अभिलाष आकेमवार, नेताजी सुभाषचंद्र बोस युवा मंडळ जामतुकुम चे अध्यक्ष मिथिन सिडाम उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व गावकरी यांना स्पर्धापरीक्षा बद्दल मार्गदर्शन नितीन उपर्वट सर यांनी केले. जीवन कौशल्य या बदल मार्गदर्शन विजय बूधे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण भालचंद्र बोलकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी आपल्या जीवनात यश कश्या पद्धतीने साध्य करेल या बदल मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद युवा मंडळ चे अध्यक्ष अभिलाष आकेमवार यांनी मुलांना मोबाईलचा व इंटरनेट चा उपयोग करून अभ्यास कशा पद्धतीने करता येईल या बदल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेताजी सुभाषचंद्र बोस युवा मंडळ चे अध्यक्ष मिथिन सिडाम यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने