Top News

वडीलांना शिवीगाळ केल्यानं घडवला रक्तपात #murder

शेजाऱ्याला दिला भयंकर मृत्यू
पुणे:- पुणे शहरातील कात्रजजवळील गुजर निंबाळकरवाडी याठिकाणी हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या केली आहे.
आरोपीनं धारदार शस्त्राने वार करत रक्तपात घडवला आहे. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने आरोपीस जेजुरी येथून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दशरथसिंग राजपूत असं हत्या झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो गुजर निंबाळकरवाडी येथील सणसनगर स्मशानभुमीजवळील रहिवासी होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी समीर बापू निंबाळकर (वय- 31) याला जेजुरी येथून अटक केली आहे. मृत दशरथसिंग राजपूत आणि आरोपी समीर निंबाळकर हे दोघंही एकमेकांच्या शेजारी राहतात.
मृत राजपूत शेळीपालनाचा व्यवसाय करायचा तसेच त्याला दारूचं व्यसन देखील होतं. दारू प्यायल्यानंतर ते सतत आरोपी समीरच्या वडिलांना शिवीगाळ करत असायचा. घटनेच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळीही देखील राजपूत दारू पिऊन घरी आला होता. यावेळी त्याने घराशेजारी राहणाऱ्या आरोपी समीरच्या वडिलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
वडिलांना सतत होणारी शिवीगाळ ऐकून समीर आणि राजपूत दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी समीरने दारूच्या नशेत असणाऱ्या राजपूतला जोरदार धक्का दिला. यावेळी राजपूत जमिनीवर खाली पडला. कारण दरम्यान रागाच्या भरात असणाऱ्या समीरने जवळच पडलेल्या लोखंडी धारदार वस्तूने राजपूतवर सपासप वार केले.
हा हल्ला इतका भयंकर होता की राजपूत जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि यातच त्याचं निधन झालं. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपी समीर निंबाळकर याला पोलिसांनी जेजूरी येथून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने