पोंभुर्णा:- आपत्तीच्या वेळी स्वयंसेवकांची मोठी भूमिका असून युवकांच्या सहकार्यामुळे अनेक बिकट आपत्तींवर मात करणे सोपे झालेले आहे. आपत्तीचे वेळी प्रशासनाला स्थानिक युवकांची मोठी मदत लाभते म्हणून महाविद्यालयीन युवकांना प्रशिक्षीत करण्याचा उत्तम असा उपक्रम गोंडवाना विद्यापीठ व चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा यांनी आयोजित केलेला आहे. त्यातून युवकांनी प्रशिक्षीत व्हावे असे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले.
स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा येथे दि. 9 व 10 फेब्रु 2022 ला गोंडवाना विद्यापीठ स्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती शुभांगी कनवाडे तहसीलदार कथा तालुका दंडाधिकारी पोंभुर्णा, यांनी केले. या कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. संघपाल नारनवरे प्रभारी प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, डॉ. एन. एच पठाण प्राचार्य चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा, तसेच डॉ. राजीव वेगीवार प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा व प्रा ओमप्रकाश सोनोने विद्यार्थी विकास अधिकारी आदी मान्यवर उद्घाटन सत्रात उपस्थित होते.
त्यानंतर प्रथम तांत्रिक सत्राच्या मार्गदर्शिका डॉ. पौर्णिमा मेश्राम सदस्या वाणिज्य अभ्यास मंडळ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी आपत्ती व व्यवस्थापनाची ओळख या विषयावर प्रकाश टाकला. सत्राचे अध्यक्ष प्रा. ओमप्रकाश सोनोने यांनी आपत्तींमध्ये युवकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
दूसऱ्या तांत्रिक सत्रात ‘विविध आपत्तींपासून कसा बचाव करावा’ याचे मार्गदर्शन प्रा. नितीन उपरवट वाणिज्य विभाग प्रमुख यांनी केले. यावेळी सत्राचे अधक्ष डॉ. वेगिनवार होते.
10 फेब्रुवारी ला प्रात्यक्षीक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. संघपाल नारनवरे व प्रा. नितिन उपरवट यांनी अपघात, आपत्ती, सर्पदंश, इत्यादी वेळेला करावयाचे प्रथमोपचार याविषयी माहिती दिली. सत्राच्या अध्यक्षा डॉ. शिला नरवाडे यांनी आपत्तींच्या वेळी अफवा ऐवजी योग्य संदेशवहनाची गरज व्यक्त केली. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जलप्रलय आणि पूर या पासून कसा बचाव करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
अग्निशमन विभाग नगर परिषद बल्लारपूर तथा नगरपंचायत पोंभुर्णा यांनी गॅस सिलेंडरला लागलेली आग, ऑईल ची आग, किरकोळ आग, इत्यादी प्रकारच्या अग्नी पासून कसा बचाव करावा याविषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर समारोप सत्रात कोरोना वैश्विक आपत्ती तसेच इतर आपत्तींमध्ये दिवंगतांना शांतीदान देण्यात आले.
या वेळी विद्यापीठ परिसरातील अनेक महाविद्यालयांच्या प्रशिक्षणार्थ्यांसह डॉ. मनिष कायरकर, प्रा. श्रावण बाणासूरे, प्रा. हागे (पाटील), प्रा. धर्मादास घोडेस्वार, डॉ. तिवारी, प्रा. सुषिलकुमार पाठक, प्रा. अमोल गारगेलवार, प्रा. सतिष पिसे, प्रा. दिलीप विरूटकर, व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व प्रशासकिय कर्मचारी उपस्थित होते.