Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मथात्मज सुतार (झाडे ) समाज द्वारे स्थानिक श्री. प्रभु विश्वकर्मा मंदीर एकोरी वार्ड येथे विश्वकर्मा जयंतीचे भव्य आयोजन #chandrapur

चंद्रपूर:- दि. १४/२/२०२२ सोमवार श्री विश्वकर्मा जयंती निमीत्त मयात्मज सुतार (झाडे) समाज च्या वतीने अनेक सामाजिक कल्पकता, चित्रकला, रक्तदान भजन सारख्या अनेक उपक्रमाची सांगड घालून एक भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम स्पर्धा, दिनांक १3 रोजी रविवार ला सकाळी १०.३० वाजता घेण्यात येईल यात चित्रकला व रांगोळी ही (टींबावकन) या गटात राहील १८ वर्षावरील मुली व महिला यांना स्पर्धेत भाग घेता येईल त्यासाठी त्यांनी सौ. रेखा दुदलकर मो. ९२८४४33१७९ व सौ. किरण बुरडकर ९०९६४४४३६१ यांचेकडे नांव नोंदवावी. या स्पर्धा चे प्रायोजक सौ. माधुरी अजय शास्त्रकार, सौ कल्पना धनंजय शास्त्राकार, सौ कीरण दिपक बुरडकर, आहेत.
चित्रकला स्पर्धा सकाळी १०.30 वाजता घेण्यात येईल. ०८ ते १० वर्षे वयोगट राहील, चित्रकलेचे साहित्य स्वतः आणावे लागेल फक्त ड्रॉईंग शीट प्राईज कडून पुरविण्यात येईल प्रथम, द्वितीय, तृतिय स्पर्धा व प्रोत्साहनपर बक्षिस तसेच प्रमाणपत्र अश्या स्वरूपान घेण्यात येईल. ही स्पर्धा स्व. रमेशराव पांडुरंगजी बुरडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरंजीव द्वय नरेश रमेश बुडकर व देवा रमेश बुरडकर यांच्या कडून देण्यात येत आहे यासाठी माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी खासदार हंसराज अहिर यांच्या विशेष सहकार्य व हातभार लाभले आहे.
सर्व कार्यक्रमाचे बक्षीस वितरण महाप्रसाद व सर्व सोपस्कार दि.14.02.2022 रोजी संपन्न करण्यात येईल असे युवा मंच चे देवा बुरडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धपत्राद्वारे कळविण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत