इंदिरानगर येथील वेकोली वसाहतीच्या क्वार्टरला आग; लाखो रुपयाचे साहित्य जळून राख #fire #firenews

Bhairav Diwase
0
घुग्घुस नगर परिषद व वेकोलीने अग्निशमन दलाच्या वाहनाची व्यवस्था करावी:- माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा
चंद्रपूर:- घुग्घुस येथील वेकोली वसाहतीच्या इंदिरा नगर क्वार्टर क्र. डीएस/ एमक्यू 177 मध्ये राहणारे राजम हनमंतू कोंकटवार (55) वेकोली कर्मचारी यांच्या क्वार्टरला शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान शॉक सर्किट मुळे अचानक आग लागली.

घरी कुणीच नसल्याने अचानक आग लागताच घरातून आगीचा धूर निघू लागल्याने शेजारील नागरिकांनी बघितले ही माहिती मिळताच पंसचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, शरद गेडाम, मल्लेश बल्ला यांना मदतीसाठी तात्काळ बोलावून घेतले.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ही माहिती एसीसी कंपनीच्या अग्नीशमन दलास दिली. अगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीत घरातील टीव्ही, फ्रीज, कम्प्युटर, एसी, बेड, सोफासेट,कागदपत्रे व जीवन आवश्यक वस्तू असे अनेक साहित्य संपूर्ण जळून राख झाले यात अंदाजे 20 ते 22 लाखाचे नुकसान झाले आहे.
याप्रसंगी शेजारील श्रीकांत नुने, ओम वैद्य, जॉय तांड्रा, शरद गेडाम, धीरज पिट्टलवार, विनय कन्नूरी, आदित्य वैद्य, ओम गुप्ता यांनी युद्धपातळीवर काम केले व मदत कार्य करून घरातील काही सामान बाहेर काढले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
   यावेळी पंसचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा यांनी घुग्घुस नगर परिषद व वेकोलीने अग्निशमन दलाच्या वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी रेटून धरली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)