Top News

शिक्षकांनी भाजप शिक्षक आघाडीचे सदस्य व्हावे:- आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार #chandrapur

भाजप शिक्षक आघाडीच्या माहिती पत्रकाचे प्रकाशन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- आ. सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष लोकलेखा समिती, डॉ. कल्पनाताई पांडे, प्रदेश संयोजिका, डॉ. उल्हास फडके प्रदेश सहसंयोजक, अनिल शिवणकर पूर्व विदर्भ संयोजक, देवरावजी भोगंळे, डॉ. मंगेश गुलवाडे भाजपा जिल्हाध्यक्ष ,राजेंद्र गांधी भाजपा जिल्हा महामंत्री, गुरुदास कामडी, प्रा. अरुण राहांगडाले भाजप शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक, मोहम्मद जिलानी यांच्या हस्ते भाजप शिक्षक आघाडीच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

भाजप शिक्षक आघाडीच्या माहितीपत्र डाऊनलोड करा
👇👇👇👇👇👇

त्यावेळी जास्तीत जास्त शिक्षकांनी भाजप शिक्षक आघाडीचे सदस्य व्हावे असे आवाहन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार अध्यक्ष लोकलेखा समिती यांनी केले.
भाजप शिक्षक आघाडी ही देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची शिक्षक आघाडी असून भाजप शिक्षक आघाडी ची निर्मिती देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी व तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमितजी शहा यांच्या संकल्पनेतून झालेली आहे. मा.नितीनजी गडकरी व मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात भाजप शिक्षक आघाडीची यशस्वी वाटचाल अविरतपणे सुरू आहे. 
भाजप शिक्षक आघाडी ही राज्यातील सात विभाग ,छत्तीस जिल्हे व तीनशे अट्ठावण तालुके पर्यंत रचना झालेली सर्वात मोठी राज्यव्यापी शिक्षक संघटना आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाच्या सर्व शाळांतील व महाविद्यालयातील शिक्षक ,मुख्याध्यापक ,प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी , पालक व शिक्षण क्षेत्रातील सर्वच विषयांना स्पर्श करणारी एकमेव राज्यव्यापी शिक्षक संघटना आहे.
भाजप शिक्षक आघाडीने मागील पाच वर्षात केलेल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा व भविष्यकाळात करावयाच्या आंदोलनात्मक विषयाचा समावेश या माहिती पत्रिकेत अंतर्भूत केलेला आहे सोबतच सदस्य नोंदणीसाठी व टेलिग्राम ग्रुप साठी क्यू आर कोड समाविष्ट केलेला असून शिक्षकांना क्यू आर कोड स्कॅन करून भाजप शिक्षक आघाडीचे निशुल्क सदस्य होण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे.
प्रकाशन करतेवेळी मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजप शिक्षक आघाडीचे कार्य अतिशय उत्कृष्टपणे सुरू असून कोणतीही मदत हवी असेल तर मी सदैव शिक्षकांच्या पाठीशी आहेत व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे सांगून सदस्य नोंदणीच्या क्यू आर कोड संकल्पनेचे कौतुक केले व शिक्षकांनी आता भाजप शिक्षक आघाडीचे सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन देखील केले.
डॉ. कल्पनाताई पांडे यांनी भाजप शिक्षक आघाडीचे माहितीपत्रक प्रत्येक शिक्षकांपर्यंत पोहोचवून मोठ्या प्रमाणात शिक्षकांची सदस्य नोंदणी करिता शाळा-शाळांमध्ये भेटी देण्याचे कळविले आहे. सोबतच आदिवासी आश्रम शाळा कार्यकारिणी, विजाभज आश्रम शाळा कार्यकारिणी ,जनता शिक्षक महासंघ ,सी बी एस ई विभाग कार्यकारणीची स्थापना करून शिक्षक आघाडीचे संघटन सर्वच क्षेत्रात निर्माण केल्याबद्दल भाजप शिक्षक आघाडीचे अभिनंदनही केले.
प्रकाशन करतेवेळी भाजप शिक्षक आघाडीच्या महाराष्ट्र संयोजिका डॉ. सौ.कल्पना पांडे, डॉ. उल्हास फडके, पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर, जिल्हा संयोजक गुरुदास कामडी.शहर जिल्हा संयोजक प्रा. अरुण राहंगडाले, मोहम्मद जिलानी ,सहसंयोजक श्रीकांत कुमरे, प्रा. पुंजाराम लोडे, प्रा. मायाताई बांगडे, मंगलाताई बंडीवार,प्रा.धनश्री चिताडे ,विनय कावडकर, रुपेश डोर्लिकर, प्रफ्फुल राजपुरोहीत,अनंत डेहनकर,नितीन गुप्ता उपस्थित होते.प्रास्ताविक भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भ संयोजक अनिल शिवणकर ,कार्यक्रमाचे संचालन प्रा.धनश्रीताई चिताडे आभार प्रदर्शन गुरुदास कामडी यानी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने