चिखली खुर्द येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन #Jivati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- ग्रामीण भागातील युवकांमध्ये अनेक कलागुण आहेत त्या कलागुणांना मंचाची गरज आहे, युवकांच्या त्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा असे प्रतिपादन गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केले. ते जिवती तालुक्यातील चिखली पाटण येथे आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर उदघाटक म्हणून जिवती पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई पवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक ममताजी जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी केंद्रे तथा चिखली पाटण येथील प्रतिष्टीत नागरिक तथा युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत