आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची सुदाम राठोड यांनी घेतली भेट #Jivati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यात पुन्हा एक शेतकरी आत्महत्या, विदर्भात सतत शेतकरी आत्महत्येचा वार सुरूच, जिवती तालुक्यात आठ दिवसाअगोदरच एक आत्महत्या झाली होती व काल दि.०७ फेब्रुवारी ला नंदपा येथील शेतकरी नानाजी तोडासे (वय २८) हे झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली.
सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती जय विदर्भ पार्टीचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदामभाऊ राठोड यांनी घरी जाऊन भेट दिल्यावर गावकऱ्यांनी सांगितली यावेळी विनोद पवार उपस्थित होते. नानाजी तोडाशे यांच्या कुटुंबात त्यांची दोन मुले व पत्नी असा परिवार आहे . कुटुंबातील कर्ता न राहिल्याने त्यांच्या कुटुंबावर आता जगायचं कस हा प्रश्न निर्माण झाला आहे तरी शासनाने लवकरात लवकर या घटनेची चौकशी करून पीडित कुटुंबियांना मदत करावी अन्यथा जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे.