कोंडय्या महाराज श्रीक्षेत्र धाबा येथे संस्थानचा शंभर बेडचे भक्तनिवास करण्याचा संकल्प #gondpipari

भूमिपूजन संत लक्ष्मणदास काळे महाराज यांचे शुभ हस्ते संपन्न
गोंडपिपरी:- श्री संत परमहंस कोंडय्या महाराज श्रीक्षेत्र धाबा ता. गोंडपिपरी येथे जयंती यात्रा महोत्सवात आलेले भावीक भक्त यांची राहण्याची, आंघोळीची, शौचालयाची पुरेशी व्यवस्था नसल्याने भावीक भक्तांची गैरसोय लक्षात घेता संस्थानच्या मालकीच्या गोंडपिपरी-धाबा हायवे रोड लगत पाच एकर जागेत शंभर बेडचे भक्त निवास दुपलेक्श भावीक भक्तांकडून मिळालेल्या देणग्यातून भक्त निवास बांधकाम करण्याचा माणस विश्वस्त मंडळाचा आहे.

कोंडय्या महाराज जन्म जयंती चे औचित्य साधून संत कोंडय्या महाराजांच्या साक्षीत्वाने व संत लक्ष्मणदास काळे महाराज यांच्या उपस्थितीत तसेच जयंती महोत्सवात आलेल्या भावीक भक्तांच्या समवेत हे भक्त निवासाचे बांधकाम पूर्णत्वास करायचे आहे. महाराष्ट्रातले आहेतच पण फारेनर सुद्धा भक्त आहेत. संस्थानचे अध्यक्ष अमर भाऊ बोडलावर व सचिव किशोर अगस्ती यांची भविष्यातील हे प्रयोजन आहे.
स्व. डॉ. ग गो गणवीर साहेब यांनी लावलेल्या रोपट्याला खत पाणी घालून त्या रोपट्याला झाडात रूपांतर करायचे आहे. माणसाचे शरीर ज्ञान व भक्ती प्राप्त करण्याचे साधन आहे म्हणून ते श्रेष्ठ होय. हे मानवीशरीर उत्तम नौकेच्या समान होय. सर्व फलांचे मूळ होय. करोडो उपाय करूनही हे मिळत नाही. तरीही दैवयोगाने हे मिळाले आहे. गुरूरूपी नावाड्याकडून तसेच संतत्रूपी वायूने ही नौका चालत आहे.
भक्तनिवास भूमिपूजन प्रसंगी अमर भाऊ बोडलावर संस्थान अध्यक्ष, बाबुराव सा बोमकंटीवार उपाध्यक्ष, किशोर भाऊ अगस्ती सचिव, स्वप्नील अनमूलवार कोषाध्यक्ष, मनोज कोपावार विश्वस्त, शेगमवार महाराज, निलेश पुलगमकर हिवरा सरपंच, भस्की कोषाध्यक्ष, राजेश्वर मामिडपल्लीवार, बोनगीवार, विठ्ठल चनकापुरे, आशीष मामिडपल्लीवर व भावीक भक्त गण उपस्थितीत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत