Top News

सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरातील विहिरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत #mul

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- मूल येथील सोमनाथ प्रकल्पाच्या परिसरातील विहिरीत एक बिबट्या काल (शुक्रवार) मृतावस्थेत आढळून आला. ही घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या बिबट्याचे वय तीन ते चार वर्षांचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या शिकारीचा पाठलाग करताना ह्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विहीरीत आढळला बिबट्या मृतावस्थेत

मूल तालुक्यातील सोमनाथ येथे स्वर्गीय बाबा आमटे यांचा प्रकल्प आहे. या परिसरात कठडे असलेली विहीर आहे. काल दुपारच्या सुमारास एक बिबट्या येथे मृतावस्थेत आढळून आला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पचा बफर क्षेत्र याला लागून आहे. त्यामुळे या परिसरात वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. काल दुपारच्या सुमारास येथील विहीरीत बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. कठडे असूनही हा बिबट्या विहिरीत पडला. त्यामुळे ही घटना शिकारीचा पाठलाग करताना घडली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच ही घटना एकदोन दिवसांपूर्वी घडल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मूल येथील वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वनविभागाचे पथक घटनास्थळी पोचले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने