Pombhurna News: १९ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षण जाहीर!

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी होणाऱ्या पोंभूर्णा तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) जाहीर करण्यात आले. 


पोंभूर्णा येथील पंचायत समितीच्या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण प्रक्रियेमुळे तालुक्यातील आगामी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


मागास व सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण स्थिती:

या जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (OBC) ३ पैकी १ जागा महिलांसाठी तर २ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. यात घनोटी तुकूम ग्रामपंचायत महिला प्रवर्गासाठी राखीव सुटली आहे, तर चिंतलधाबा आणि घोसरी या दोन ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.


याशिवाय, सर्वसाधारण प्रवर्गातील एकूण १६ जागांपैकी ८ जागा महिलासाठी तर उर्वरित ८ जागा सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

महिला व सर्वसाधारण राखीव ग्रामपंचायतींची यादी:

महिला व सर्वसाधारण राखीव ग्रामपंचायतींची यादी:

मागास प्रवर्ग (महिला):- घनोटी तुकूम

सर्वसाधारण महिला:- देवाडा खुर्द, भिमणी, केमारा, कसरगट्टा, जामखुर्द, नवेगाव मोरे, थेरगाव (रै.) आणि चक ठाणा.

मागास प्रवर्ग (खुला):- चिंतलधाबा, घोसरी, 

सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग ग्रामपंचायती:- मोहाळा (रै.), उमरी पोतदार, जामतुकूम, चेक ठाणेवासणा, चेक आष्टा, आंबेधानोरा, देवाडा (बु.) आणि चेक हत्तीबोडी.

आरक्षण जाहीर झाल्यापासून इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून गावागावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.