Top News

अस्वलीच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी #Injured


गोंडपिपरी:- तालुक्यातील करवन टोला येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला. ही घटना शुक्रवार, ४ फेब्रुवारीला सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास करवन बफर कक्ष क्रमांक ७६३ येथे घडली. रामदास गोविंदा सिडाम (४५, रा. करवन टोला) असे जखमीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामदास सिडाम हे नेहमीप्रमाणे शेतात धान पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. घरी परतत असताना अस्वलीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. अस्वलीने डोक्यावर आणि कानावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. ही माहिती करवण गावातील पीआरटी चमूला देण्यात आली. लगेच चमूने जखमी रामदास सिडाम यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात रामदासच्या दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथील जिल्हा रुणालयात पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले. जखमीला योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कटवन ग्रामपंचायतचे उपसरपंच रजत सिडाम यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. यावेळी वनविभागाचे वनपाल जोशी, वनरक्षक बंडू परचाके, वासेकर यांच्यासह पीआरटी चमू उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने