Top News

सास्ती ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या कामांमधील भ्रष्टाचाराची होणार चौकशी - सुरज ठाकरे यांच्या मागणीला यश. #Rajura



राजुरा:- राजुरा तालुक्यातील मतदार सारथी अंतर्गत 2014 व 15 या कालावधीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग राजुरा यांच्यातर्फे अतिरिक्त सहायता निधी अंतर्गत रामनगर शासकीय पाणीपुरवठा योजनेची कामे करारनामा क्रमांक ब -१/१५ वर्ष २०१४-१५ अंतर्गत पूर्ण झाली आहेत परंतु ग्रामपंचायत सास्ती पंचायत समिती राजुरा तर्फे काढण्यात आलेल्या पत्रामध्ये काम पूर्ण झाल्याचे स्पष्टपणे लिखित स्वरूपात लिहिलेले आहे व हे दोन्ही पत्र जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे असून कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांचे पत्र खरे व कुठल्या शासकीय अधिकाऱ्याचे पत्र खोटे ठरवायचे हा मोठा प्रश्न उभा झालेला आहे जनसामान्यांच्या करांमधून ही कामे झाली आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग राजुरा यांच्या प्राप्त पत्र व ग्रामपंचायत सारथी पंचायत समिती राजुरा यांच्या प्राप्त पत्राचे आधार घेऊन सुरेश ठाकरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नागपूर महाराष्ट्र राज्य यांच्याकडे *या कामांमध्ये ५५ लाख ६१हजार २०७ रुपयांचा घोळ झाला. असल्याची तक्रार दिली आहे* वास्तविक पाहता मौज मस्ती रामनगर नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अर्बन रुलर स्कीम डिव्हिजन चंद्रपूर शास्त्री रामनगर वॉटर सप्लाय स्कीम सन २०१४-१५ ची कामे पूर्ण झाली म्हणून उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक २५/०२/२०१६ ला संपन्न झाला. काम पूर्ण झाले म्हणून जीवन प्राधिकरण राजुरा यांनीसुद्धा प्रमाणपत्र दिनांक १५/१०/२०१८ रोजी दिले आहे. तत्कालीन ग्रामसेवक यांनी २०/०४/२०१८ रोजी प्रमाणपत्र दिले की, त्यांचेकडे साडेसात हॉर्स पावर चे दोन मोटार व एक बारा हॉर्सपॉवरची मोटार चालू आहे.
वास्तविक पाहता या योजनेत २० हॉर्सपॉवर चे दोन मोटार दिसून येत आहे. परंतु मुळात तसे न करता साडेसात हॉर्सपॉवरची एक व बारा वाजता वरची एक मोटार आधीपासूनच उपलब्ध असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे. एकंदर पाणीपुरवठा योजनेमध्ये आठ कामे दर्शविली आहेत, त्यातून खरे पाहता त्यातील सात कामे झाली नसतानादेखील पैशाची उचल तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ठेकेदार व ग्रामपंचायत तील सर्व सदस्यांनी मिळून केली. असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी या पत्रामध्ये केला आहे. व तसे पुरावे देखील *श्रीनिवास विरय्या दा यांच्या माध्यमातून* सुरज ठाकरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र नागपूर यांच्या द्वारे संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला व त्या अनुषंगाने राजुरा पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर बहादुरे यांना देखील पत्र प्राप्त झाले .व त्यांनी *गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा यांना तशा आशयाचे पत्र पाठवून चौकशी करून या प्रकरणांमध्ये घोळ आढळल्यास पोलीस स्टेशन राजुरा येथे येऊन तक्रार करण्यासंदर्भात सांगितले आहे* यावरूनच सुरज ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाल्याचे सुरज ठाकरे यांनी सांगितले आहे . आता गटविकास अधिकारी पंचायत समिती राजुरा किती दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.#rajura

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने