Top News

U19 वर्ल्ड कप फायनल... #U19worldCup #final

भारत आणि इंग्लंड आज आमने-सामने
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होणार आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा कर्णधार यश धुल याने शतक मारत ऑस्ट्रेलिया संघाचा ९६ धावांनी पराभव केला होता.
भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, इंग्लडच्या संघाशी आज (५ फेब्रुवारी) सामना होणार आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात पुन्हा विजय मिळवण्याचा प्रयत्न संघाकडून केला जाणार आहे.
गेल्या १४ सत्रांमध्ये आठ फायनल खेळून चार विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर इंग्लंडच्या संघाने हा पराक्रम फक्त एकदाच केला आहे. त्यामुळे यंदाही भारतीय सामनाच १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास संघाकडून व्यक्त केला जात आहे.
मैदानाबाहेर कोरोना संसर्गाशी झुंज देत असतानाही भारतीय संघाने अंतिम फेरी गाठल्याने संघाचे कौतुक होत आहे. कारण अंडर १९ वर्ल्ड कपच्या प्रवासात भारताच्या आयर्लंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वीच भारताचे सहा खेळाडू आयसोलेशनमध्ये गेले होते. यात संघाचा कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराधअया यादव, मानव पारीख हे आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटीव्ह आढळले होते. त्यामुळे काहीशी चिंता निर्माण झाली होती. मात्र, या परिस्थितीमुळे खचून न जाता संघाने उत्तम खेळ खेळला. यावरून खेळाडूंची प्रतिभा आणि संघाची एकी दिसून आली.
येथे पाहता येईल

अंडर-१९ विश्वचषकाचा अंतिम सामना आज सायंकाळी ६.३० वाजता होत आहे. नाणेफेक सायंकाळी ६ वाजता होईल. हा सामना अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर होईल. यासामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर असेल. तसेच, या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवरही पाहू शकाल.
भारताचा संघ असा

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गरव सांगवान, दिनेश बाना, आराध्या यादव, राजवर्धन यादव. वासू वत्स, रवि कुमार
इंग्लंडचा संघ असा

टॉम पर्स्ट (कर्णधार), जॉर्ज बेल, जोशुआ बॉयडेन, ॲलेक्स हॉर्टन, रेहान अहमद, जेम्स सेल्स, जॉर्ज थॉमस, थॉमस ऍस्पिनवॉल, नॅथन बार्नवेल, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, विल्यम लक्सटन, जेम्स र्यू, फतेह सिंग, बेंजामिन क्लिफ.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने