Click Here...👇👇👇

सर्वांना उत्सुकता होती तारखेची...! अखेर ति तारीख ठरली...! #Date

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं कार्यक्षेत्र असलेल्या पोंभूर्णा येथील नगरपंचायत व्हाईट हाऊसमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचीच उत्सुकता लागली होती. अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अखेर या निवडणुकीच्या रणांगणाचा निकाल जाहीर झाला आहे. पोंभूर्णा नगर पंचायत निवडणुकीत भाजपाने १७ जागांपैकी १० जागेवर विजय मिळवित बहूमत मिळवून पोंभूर्णा व्हाईट हाऊसवर आपला विजयी झेंडा फडकवला होता.
१९ जानेवारीला निकाल घोषित झाला, त्यात पोंभुर्णा नगर पंचायतीच्या १७ जागांपैकी १० जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पोंभुर्ण्याच्या व्हाईट हाऊसमध्ये परत एकदा भाजपाचीच सत्ता असणार आहे. पोंभुर्ण्यात काँग्रेसला फक्त १ जागेवर विजय मिळविता आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे दोन जागेवर विजय मिळविला आहे. तर शिवसेनेने चार जागा जिंकल्या आहेत.
मात्र निवडणूक पार पडल्यानंतर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे व्हाईट हाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्णा नगरपंचायतीचा अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा शहरात रंगू लागली. पान टपरीवर, चौका चौकात गप्पा रंगत होत्या. सर्वांना उत्सुकता होती तारखेची...! अखेर ति तारीख ठरली. येत्या ११ फेब्रुवारी ला अध्यक्षपदाच्या निवडणूकीकरीता विशेष सभा होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या 2 फेब्रुवारी रोजीच्या जाहिर केलेल्या नगरपंचायत अध्यक्षपदाचा निवडनुक कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

नामनिर्दशन पत्र स्विकारण्याची तारीख नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासुन ते 7 फेब्रुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत.

छाननी 7 फेब्रुवारी दुपारी 2 नंतर

नामनिर्दशन पत्र फेटाळण्यात आली त्यांची नावे व कारणे सुचनाफलकावर प्रसिद्ध करणे 7 फेब्रुवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत

पिठासीन अधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द अपिल दाखल करण्याचा कालावधी 7 फेब्रुवारी सांयकाळी 5 वाजेपासुन 9 फेब्रुवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत

वैध नामनिर्दशन पत्राची यादी सुचनाफलकावर प्रसिध्द करणे 9 फेब्रुवारी सांयकाळी 5 नंतर
उमेदवारी मागे घेणे 10 फेब्रुवारी दुपारी 4 वाजेपर्यंत

उमेदवारांची अंतिम यादी 10 फेब्रुवारी दुपारी 4 नंतर

अध्यक्षपदासाठी निवडनुकीकरीता विशेष सभा 11 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता.

निवडणुक लढविणारा व ऊमेदवारी मागे घेतलेल्या ऊमेदवारांची नावे विशेष सभेत वाचून दाखविणे 11 फेब्रुवारी दुपारी 12.05 नंतर.

अध्यक्षपदासाठी निवडनुक व निकाल घोषीत करणे 11 फेब्रुवारी दुपारी 12.10. नंतर.

तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष पदाची निवडणुक सुध्दा 11 फेब्रुवारी ला होणार आहे. निवडणूकीकरीता पिठासीन अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी दिप्ती सुर्यवंशी आणि मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक काम पाहतील.