राजुरा येथे मानवाधिकार सहायता संघाची सभा संपन्न #Humanrights

मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी नेहमी प्रयत्नशील राहा- रवी धारणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
दि. 30 जाने. 2022 रोज रविवारला राजुरा येथे मानवाधिकार सहायता संघ राजुरा तालुक्याची सभा मानवाधिकार सहायता संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय सचिव सन्माननीय श्री. रवी धारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.


त्याप्रसंगी मानवाधिकार सहायता संघाचे चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री अशोक पडगेलवार, महासचिव श्री संतोष क्षीरसागर, संरक्षक श्री अनिल गर्गेलवार, श्री कार्लेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री रवी धारणे यांनी मानवाधिकाराचे महत्त्व पटवून दिले, तसेच मानवाधिकार सहायता संघ चंद्रपूरचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांनी काही जादूचे प्रयोग दाखवून सर्वांचे मनोरंजन केले.


त्याप्रसंगी सभेला मानवाधिकार सहायता संघ राजुरा तालुका प्रमुख प्रा.अनंत डोंगे, तालुका उपप्रमूख, श्री.अंकुश भोंगळे, तालुका संरक्षक श्री. मालेकर सर, तालुका चेअरमन अँड. राहुल थोरात, तालुका उपाध्यक्ष श्री.सुभाष काटवले, तालुका मुख्य महासचिव अँड. चंद्रशेखर चांदेकर, तालुका महासचिव श्री.रत्नाकर पायपरे, संघटन मंत्री प्रेमसागर राऊत, तालुका संयोजक इर्षाद शेख तालुका सहसंयोजक श्री. अर्जुन पायपरे, राकेश कलेगुरवार, अनिलकुमार गिरवीला, तसेच अनेक पदाधिकारी, सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन मानवाधिकार सहायता संघ तालुका प्रमुख सन्माननीय अनंत डोंगे सर यांनी केले.#Humanrights

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत