जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चंद्रपूर प्रीमियर लीगमध्ये नीरज मत्तेची उल्लेखनीय कामगिरी #CPL

चंद्रपूर:- नुकत्याच पार पडलेल्या सीपीएल (चंद्रपूर प्रीमियर लीग ) सिजन 8 मध्ये राजुरा चे रहिवासी व वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रातील एरिया मुख्यालय बल्लारपूर एरिया येथील कार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले राजुरा येथील निरज मत्ते यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.
चंद्रपुर प्रीमियर लीग मधील डायनॅमिक फायटर्स या संघात खेळत होते. निरजच्या उत्कृष्ट खेळीमुळे या संघाला यंदा विजेतेपद संघाचा सन्मान प्राप्त करता आला. अंतिम सामन्यात भद्रावती ग्रेनेड्स या संघा विरुद्ध गोलंदाजी करताना 4 षटकांमध्ये फक्त 10 रन देत 3 विकेट्स घेत निरज मत्ते यांनी आपल्या संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या डीकेपीएल राजुरा मध्ये सुद्धा निरज मत्ते यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले होते व सोबतच पेंच येथे झलेल्या डब्लू सी एल राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतही निरज मत्ते सहभागी झाले होते. नीरज मत्ते यांच्या खेळातील उत्तम कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
निरज मत्ते यांच्या या घवघवीत यशा बद्दल डब्लू सी एल चे क्षेत्रीय महाप्रबंधक सब्यासाची डे,जी. एम. ऑपरेशन सी.पी. सिंघ,क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक समीर बारला,प्रबंधक नवीन बिल्ला जेष्ठ प्रबंधक शैलेश माटे, क्रीडा कमिटीचे मुख्य प्रमोद आहुते व संपूर्ण बल्लारपूर क्षेत्र तथा समस्थ कार्मिक विभाग यांनी निरज मत्ते यांचं अभिनंदन केलं आहे.

1 टिप्पणी: