गंगामाता देवस्थान मराईपाटण मंदिराच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
सदर ठिकाण हे जिवती तहसील अंतर्गत येतो. गंगामाता हे चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड पहाडावरील जिवती तालुकाचे समस्त समाज बांधवांचे प्रिय आराध्यदैवत आहे. पूजनामध्ये गंगामताला पहिले स्थान दिलेले जाते.विशेष म्हणजे शेतकरी बांधव हा कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गंगामातेचा पूजन करूनच करतात, कारण ते कार्य करताना कोणतेही विघ्न,बाधा न येता पूर्णत्वास जावे म्हणून मातेचा पूजन करून त्याचे शुभ आशीर्वाद घेतले जातात. जिवती तालुक्यात दोन स्थळ हे लोकप्रिय ठिकाण १. जंगूबाई देवस्थान, २.गंगामाता देवस्थान असे या ठिकाणाचा पूजन केलो जातो. ह्या देवस्थाना हे नैसर्गिक व निसर्गरम्य, रम्यमान जागेत वसलेली गंगामाता अशा हे ठिकाण आहे.पूजरी यादवराव कोटनाके उद्घाटक तिरू. लिंगु पाटील कुमरे, रमेश पाटील कोटनाके यांच्या हस्ते आज गंगामाता मंदिराचा भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र तथा तेलंगणातील आदिवासी बांधव गंगामाता देवस्थान येथे पोहोचलेत. जिवती तालुक्यातील गंगामाताप्रेमी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्था व तालुक्यातील आदिवासी समाजचे मदतीने पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून मंदिर निर्माण करण्याचा ठरविले आहे. यापुढे गंगामाता देवस्थान यांचा आदर्श ठेवून येथील तालुक्यातील आदिवासी गोंड समूहाचे गावगाडा चालणार आहे. यासाठी आदिवासी समाजाच्या डोळ्यांसमोर सतत गंगामाता दिसावेत, अशी समाजाचे भावना आहे मंदिर निर्माण समितीत अध्यक्ष लक्ष्मीकांत केशवराव कोटनाके, सचिव पितांबर करपते व समस्त समजा बांधव यांचा समावेश आहे. गंगामातेचा मंदिराची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा असून, मंदिर निर्मिती करिता सर्व भक्तांना गंगामाता देवस्थान ट्रस्ट कडून आव्हान करण्यात येत की, गंगामाता मंदिर निर्मिती ही समस्ता बांधवांची अस्मितेचा प्रश्न आहे लोकवर्गणीतून मंदिर बांधकाम करण्यासाठी जगभरातील समस्ता समाज बांधव मदतीचे हात समोर करावी. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून मंदिर निमिर्ती साठी सहकार्य करावी. या कामासाठी अधिकृत स्वयंसेवकांची नियुक्ती करून वर्गणी गोळा करण्यासाठी जातील यावेळी गंगामाता देवस्थान पुजारी यादवराव पाटील कोटनाके व कोटनाके परिवार व समस्ता समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत