जाहिरात... Advertisement... विज्ञापन

14 वर्षीय मुलीचा विहिरीत आढळला मृतदेह

(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येनापूर येथे 14 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी ला उघडकीस आली.
सुजाता जनार्दन गोंगले वय 14 वर्ष रा. येनापूर ता. चामोर्शी. असे विहिरीत आढळून आलेल्या मृतक मुलीचे नाव असून ती इंदिरा गांधी विद्यालय येनापूर येथे आठव्या वर्गात शिकत होती.
सविस्तर वृत्त असे की, मृतक मुलगी 26 फेब्रुवारी ला सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडली. परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने तिच्या कुटूंबियांनी शोधा शोध केली परंतु ती आढळून आली नाही. तिचा भाऊ प्रेमानंद गोंगले यांनी आष्टी पोलीस ठाण्यात सुजाता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
28 फेब्रुवारी सोमवारला सकाळी 12 वाजता तीचा मृतदेह पुरुषोत्तम राऊत यांच्या विहिरीत तरंगताना आढळून आला. याबाबतची माहिती आष्टी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतक मुलीचा मृतदेह बाहेर काढला व आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.

घटनेने कारण अद्याप अस्पष्ट असून तिने आत्महत्या की हत्या? हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत