Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीला गेलेल्या माय-लेकाचा बुडून मृत्यू death

गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर-लोणवली येथील वर्धा नदी पात्रातील डोहात बुडत असलेल्या आपल्या मुलाला पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या मातेला त्यामध्ये अपयश आले. त्यातूनच मुलगा आणि आईचा बुडून मृत्यू झाला.
हृदय हेलावून सोडणारी ही घटना सकमुर-लोणवलीच्या वर्धा नदीच्या घाटावर घडली. पदमा अरकोंडा आणि रक्षित अरकोंडा रा. लोणवेली (तेलंगणा) अशी मृत माय-लेकाची नावे आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर माय-लेकाचे शव मिळाले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत