Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

स्टेट बॅंक ऑफ इंडियाला चक्क १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा चुना #SBI

चंद्रपूर:- अधिक गृहकर्जासाठी कर्जदारांनी बॅंकेचे अधिकारी व एजंटसह हातमिळवणी केली. बनावट आयकर कागदपत्र सादर करीत स्टेट बॅंक ऑफ इंडियाला चक्क १४ कोटी २६ लाख ६१ हजार ७०० रुपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ११ कर्जधारकर, एक एजंट व बॅंकेच्या ३ तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. न्यायालयाने तीनही बॅंक अधिकाऱ्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर १२ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
श्वेता महेश रामटेके (४२, रा. बाबूपेठ), वंदना विजयकुमार बोरकर (४०, रा. नगिनाबाग, चंद्रपूर), योजना शरद तिरणकर (४२, रा. दाताळा, चंद्रपूर), शालिनी मनीष रामटेके (४५, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती), मनीष बलदेव रामटेके (४७, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती), मनीषा विशाल बोरकर (रा. आंबेडकर वॉर्ड, भद्रावती), वृंदा कवडू आत्राम (४९, रा. वरोरा), राहुल विनय रॉय (३६, रा. माजरी), गजानन दिवाकर बंडावार (३९, रा. धाबा), राकेशकुमार रामकरण सिंग (४२, रा. सास्ती राजुरा), गीता गंगादिन जागेट (वय ५३, रा. घुग्घुस असे अटकेतील कर्जदारांचे तर एंजट गणेश देवराव नैताम (३६, रा. पोंभुर्णा ह. मु. कोसारा) व पंकजसिंह किशोरसिंह सोलंकी (३९, रा. तुकूम, चंद्रपूर), विनोद केशवराव लाटेलवार (३८, ह. मु. हनुमाननगर तुकूम, चंद्रपूर, मूळ पत्ता वार्ड क्र. ४ सावली), देवीदास श्रीनिवासराव कुळकर्णी (५७, रा. मुकुंदनगर, अकोला मूळ पत्ता बादुले बुद्रूक, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) अशी अटकेतील बॅंक अधिकाऱ्यांची नावे आहेत.
आरोपींवर ४२०, ४०६, ४०९, ४१७, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) भादंविचा गुन्हा दाखल केला. तपासात बनावट आयकर रिटर्न सादर केल्याचे समोर आले. त्यावरून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के करीत आहेत. तपासात पुन्हा काही बडे मासे अडकण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत