Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षाची हत्या #murder


वरोरा:- वरोरा तालुक्यातील शेगाव (बू) येथील युवक समाज सेवा करणारा तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती शेगाव बू चे अध्यक्ष महेश बबनराव घोडमारे वय वर्षे ३० याची हत्या झाला असल्याची माहिती आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकिस आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. संदीपभाऊ गिऱ्हे आपणास उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा

सविस्तर असे की, शेगाव येथील तंटामुक्त समिती चे अध्यक्ष महेश घोडमारे समाज सेवक असून तो खाजगी क्षेत्रात तो जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, असे विविध कामे तो करून जनतेची सेवा करीत होता त्याच बरोबर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करीत होता.
विशेष म्हणजे महेश हा सर्व कामात तरबेज असून तो गावात तसेच गाव परिसरात त्याची चांगली प्रतिमा होती. परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून महेश हा आपल्या कामाकरीता बाहेर गेला होता तो घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली शिवाय काल २२ तारखेला त्यांच्या भावाने पोलीस स्टेशन शेगाव येथे माझा भाऊ हरविला असल्याची लेखी तक्रार दिली.
तेव्हा येथील पोलीस कर्मचारी देखील आपल्या कामाला लागले दरम्यान आज सकाळी त्यांच्या भाऊ याने अधिक माहिती घेतली असता त्याचा भाऊ मेसा येथून दुसऱ्याच्या दूचाकी बसून वरोरा येथे रवाना झाला असल्याची माहिती समोर आली शिवाय ही गाडी मेसा समोरील जंगलात उभी असल्याची खात्री काही लोकांनी दिली यांच्या आधारे घटना स्थळ गाठले असता झुळपाड त्याची चप्पल, रक्त, रक्त बांबाळ असलेले लोखंडी रॉड व झुळुपा आड प्रेत आढळून आले तेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना देताच येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या ताफ्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास चक्र वेगाने फिरवून आरोपींना अटक केली
पुढील तपास शेगाव स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्रम यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत