Top News

गावच्या आठवणीने महेश कोलावार झाले भावूक #chandrapur

गाव म्हणजे गोड आठवणींचा ठेवा असतो, गाव म्हणजे भूतकाळातील बालपणीचा स्वर्ग असतो

भाजपा युवानेते तथा युवाकवी महेश कोलावारांचे प्रतिपादन

चंद्रपूर:- गाव म्हणजे गोड आठवणींचा ठेवा असतो, गाव म्हणजे भूतकाळातील बालपणीचा स्वर्ग असतो असे प्रतिपादन भाजपा युवानेते तथा युवाकवी महेश कोलावार यांनी केले आहे.

गाव सोडून ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आठवणींने भावूक झालेले महेश कोलावार आपल्या गावच्या आठवणींबद्दल बोलतांना म्हणाले की अख्खा जग फिरला तरी,माणूस आपल्या कामाने कितीही व्यस्त असला तरी वेळ मिळेल तेव्हा गावाला जावे असे नेहमीच वाटते.पण परिस्थिती,वाढतं वय हे माणसाला आर्थिक दृष्टीने सक्षम व जबाबदा-या स्वीकारायाच्या दिशेने बंदिस्त करुन ठेवतो. त्यातच माणूसही कायम व्यस्त असतो.
युवाकवी तथा भाजपा युवानेते असलेले महेश कोलावार यांचे मुळगाव गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा हे तालुक्याचे ठिकाण. शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्ताने चंद्रपूरला २०११ च्या दरम्यान आले.विविध ठिकाणी शिक्षण झाले तरी माञ चंद्रपूर हेच त्यांचे मागील ११ वर्षापासून ठरविलेले ठिकाण होते.
शालेय जीवनापासूनच अनेक क्षेञात कार्यरत असलेले कोलावार पुढे-पुढे त्या क्षेञात सक्रिय होत गेले. शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, चिञपट, राजकारण अश्या विविध क्षेञात कार्यरत आहेत.आज गाव सोडून ११ वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त आपले भावना व्यक्त करतांना एक दशकापूर्वीच्या गावच्या गोड आठवणींना उजाळा देतांना भावूक झाले.जगात कुठेही असले तरी,कितीही नावलौकिक झाले तरी आपल्या गावाला माञ कधी विसरू नका असा संदेशही यावेळी दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने