भोयगाव येथे दानशूर अन्नदाते यांनी पुरात अडकलेल्या वाहनचालकांना केली मदत #chandrapur #Korpana


कोरपना:- कोरपना तालुक्यातील भोयगाव (नदीकिनारा) येथे नदीचा पुल पुर्ण बुडाल्याने आलेल्या पुरामुळे बाहेरून आलेल्या वाहनचालकांना नदीकिनारा ते भोयगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.त्यामुळे माल वाहतूक करणारी वाहने नदीकिनारा भोयगाव येथे अडकून पडली सर्वत्र पावसाचा मारा व कोरोनासदृश परीस्थिती अशा परीस्थिती मध्ये वाहन चालकांचे अन्नावाचुन हाल होऊ नये. म्हणून भोयगाव येथील अन्नदात्यांनी एकत्र येऊन त्यांच्या अन्नाची व्यवस्था केली.

गेली अनेक वर्षे म्हणजे २००६ साली सुध्दा पावसाने हाहाकार माजवला होता त्यावेळीही रस्ता वाहतुकीसाठी 5 दिवस बंद होता त्यावेळी सुध्दा भोयगाव येथील अन्नदाते एकत्रित आले व वाहन धारकांना अन्नदान केले होते. व ज्या ज्या वेळी महापुरामुळे वाहतूक बंद होईल. त्या त्या वेळी वाहन चालकांना भोयगाव येथील अन्नदात्यांनी वाहन चालकांना चहा, नास्ता व दोन वेळचे जेवन वाहन चालकांना पुरवण्याचे काम केले आहे. तसेच पोलिस स्टेशन गडचांदुर पोलिस निरीक्षक सत्यजित आमले, तहसील कार्यालय कोरपना तहसीलदार विनोद डोणगावकर, यांनी वेळोवेळी संपुर्णपणे जबाबदारी सांभाळली .
यावेळी ग्रामपंचायत भोयगाव येथील सरपंच शालीनी ताई बोढे, सचिव ढोरे मैडम,तलाठी लक्ष्मीकांत मासीरकर, पोलीस पाटील पुरुषोत्तम गावंडे, ग्रामरोजगार सेवक दत्तु कासीपेठा, तसेच भोयगाव येथील अन्नदाते अंकुश चिने, विठ्ठल उपरे,अजमत खान पठाण, रमेश पारखी, सुभाष पाचभाई,सुर्यभान पोतराजे,बाबूजी आत्राम, दिनकर टाले,किसन डोंगे, अविनाश लांजेकर,फास्टर संदीप उराळे, भोयगाव समस्त ग्रामवासी व या सर्व अन्नदात्यांनी सहकार्य केले त्यामुळे या सर्वांचे वाहनचालकांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत