तरुणांची रस्त्यावर धूम स्टाईल मस्ती आली अंगलट #mul #chandrapur #accident

चारचाकी वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी
मुल:- सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुल तालुक्यापासुन 8 किलोमीटर वर असलेल्या सोमनाथ (ता. मुल) या निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या धबधब्यावर तरुणांची तुफान गर्दी पहावयास मिळत आहे.

मारोडा गावांतून गेलेल्या रस्त्यावरुन तरुण पीढी अती वेगाणे वाहन चालवत आहे. असे काही जागृत लोकांचे म्हणणे आहे. अशातच काल सायंकाळच्या सुमारास मुल येथील काही युवा तरुण कारने सोमनाथ वरुन येत असतांना गाडीवरुन नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन पलटी घेत रस्त्याचा कडेला जाऊन पडली. या अपघातात गाडीत बसलेले 4 तरुण गंभीर जखमी प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत