इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता.... #Chandrapur

Bhairav Diwase
0
संग्रहित छायाचित्र 

 चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असून इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ईरई नदीच्या काठावर राहणाऱ्या १) इरई नदी लगत वडगांव वार्ड हवेली गार्डन एरीया, नगिनाबाग वार्ड महसुल कॉलनी, सिस्टर कॉलनी एरीया, रहेमत नगर वार्ड रहेमत नगर एरीया २) झरपट नदी लगत तुळजा भवानी वार्डात- भंगाराम ऐरीया , महाकाली वार्ड- सोनारी मोहल्ला एरीया , दादमहल वार्ड- काजीपुरा वसाहत ऐरीयातील सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वतः नदीच्या पात्रापासून दुर सुरक्षित ठिकाणी रहावे तसेच आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दुर ठेवण्यात यावी.

चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इरई धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत असून इरई धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा, बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपुर, माना आणि इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, त्यांनी स्वत नदीच्या पात्रापासून दूर राहावे तसेच आपली गुरे व इतर मालमत्ता नदीच्या पात्रापासून दूर ठेवावी अन्यथा होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जिवीत किंवा वित्त हानीस महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही. तसेच, इरई धरणाच्या क्षेत्रातील संभाव्य धोका लक्षात घेता प्रतिबंधक उपाय व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून धरणाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)