मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिराेली दाैऱ्यावर #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase

गडचिरोली:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गडचिरोलीस रवाना झाले आहेत.

या दाैऱ्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. ते लिहितात गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह गडचिरोली दौऱ्यावर निघालो आहे.
चार वाजता एकनाथ शिंदे हे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता पूर परिस्थितीबाबत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन सोबत आढावा बैठक घेणार आहेत.