राजुरा ते टेकामांडवा ते भारी लिंगनडोह-नागापूर मार्गे बस सुरू करा:- सुदाम राठोड* #Jiwati

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- २७ जून पासून शाळा सुरू झाली असून सारे शिकूया पुढे जाऊया शासनाच्या या एककलमी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी शाळेत जाणे अनिवार्य असल्यामुळे ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य असता कामा नये, म्हणून ज्याप्रमाणे पालडोहची जि. प.शाळा ही ३६५ दिवस म्हणजे वर्षभर सुरू असते म्हणून पालडोह क्षेत्रातील ग्रामीण भागातून विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीसाठी बससेवा पुरवणे शासनाचे आद्यकर्तव्य आहे, बससेवा अश्याप्रकारे सुरू झाली पाहिजे.
राजुरा ते गडचांदूर-बेलमपूर-नोकारी फाटा-गवारी गुडा-बांबेझरी-लिंगनडोह-पेद्दा आसापूर-आसापूर-नागापूर-धोंडअर्जुनी-पालडोह-टेकामांडवा ते माराईपाटण मार्गे भारी बससेवा सुरू करणे, शेतकरी व विद्यार्थ्यांचे हिताचे आहे.अशी मागणी राजुरा आगार प्रमुख यांना विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूर विभागीय अध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)