अबब... ठाण्यातूनच पोलिसांची गाडी घेऊन आरोपी पसार #chandrapur #warora
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- पोलिस म्हटले तर चांगल्या चांगल्यांची पाचावर धारण बसते. त्यामुळे पोलिसांपासून दूरच राहणे पसंत करतात. मात्र काही जण तर पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार होतात. अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पोलिसांनी अटक करून ठाण्यात आणलेल्या एका आरोपीने तर चक्क पोलिसांची गाडी घेऊन ठाण्यातून पसार झाल्याची घटना रविवारी वरोरा पोलिस ठाण्यात घडली. राकेश असे आरोपीचे नाव आहे. आता पोलिस परत आरोपी आणि गाडीचा शोध घेत आहेत.
वरोरा शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील मजरा गावात राकेश नावाचा व्यक्ती दारूचा नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने मजरा गावात जावून गोंधळ घालणाऱ्या राकेश नावाच्या आरोपीला पोलिस ठाण्यामध्ये आणले. त्याच्यावर 185 कलमान्वये कारवाई देखील करण्यात आली. मात्र, हा आरोपी लघुशंकेसाठी बाहेर जातो, असे सांगून पोलिस ठाण्याच्या बाहेर पडला. पोलिस ठाण्यातच्या आवारातच उभी असलेली 185 क्रमांकाची पोलिसांच्या वाहनाची चाबी लागलेली गाडी घेऊन त्याने ठाण्यातूनच पळ काढला. काही पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरोपीचा पाठलाग करणे सुरू केले. तोपर्यंत आरोपी चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील येसा या गावापर्यंत पोहोचला होता. पुढे आरोपी आणि मागे पोलिस असा फिल्मी स्टाईल प्रकार सुरू होता. त्यांनतर पोलिस आपल्याला पाठलाग पकडणार असल्याचे लक्षात येताच त्याने गाडी अधिक जलदगतीने चालविण्याचा प्रयत्न करताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर आदळली. या घटनेत तो बचावला मात्र पोलिसांच्या हातात गवसला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपांनी यांनी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत