भद्रावती तालुक्यात शिक्षणाचे तीन-तेरा #bhadrawati

६२२ पैकी केवळ एक विद्यार्थी नवोदय परीक्षेत पात्र
भद्रावती:- नुकत्याच लागलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात ६२२ विद्यार्थ्यांपैकी केवळ एक विद्यार्थी पात्र ठरल्याने भद्रावती तालुक्यात शिक्षणाचे तीन-तेरा वाजल्याचे पालकवर्गात बोलले जात आहे.
भद्रावती तालुका हा एक समृद्ध तालुका समजला जातो. या तालुक्यात वेकोलि, आयुध निर्माणी आणि विविध उद्योगधंदे आहेत. त्यामुळे नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी बराचसा पालकवर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही तालुका शिक्षण विभागाच्या उदासीन धोरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
एकीकडे दहावी-बारावीचा बोर्डाचा निकाल १०० टक्के लावणा-या शाळा तालुक्यात असताना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत संपूर्ण तालुक्यात केवळ एक विद्यार्थी पात्र ठरतो ही तालुक्याच्या शिक्षण विभागाची शोकांतिकाच असल्याचे सुज्ञ पालकवर्गात बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत