Click Here...👇👇👇

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी #gadchiroli

Bhairav Diwase
गडचिरोली:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात माेठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गडचिरोलीस रवाना झाले.

गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी व उपाय योजनेसंदर्भात माहिती दिली.