Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

पोंभूर्णा येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य लाभार्थी मेळावा आणि गरजूंना अन्नधान्य किट व ब्लँकेट चे वाटप chandrapur pombhurna


पोंभुर्णा:- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज पोंभुर्णा येथील राजराजेश्वर मंदिराच्या सभागृहात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उपलब्ध ३०० अन्नधान्य किट व ३०० ब्लँकेटचे गरजूंना वाटप करण्यात आले.
याप्रसंगी, विविध योजनेच्या लाभार्थी यांच्या हाताने केक कापून मोदीजींचा वाढदिवस तालुक्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. याचदरम्यान काल नागपूर येथे धनोजे कुणबी समाज विकास महासंघाच्या वतीने "समाजभूषण पुरस्कार" मा. देवराव भोंगळे यांना मिळाला होता त्यानिमित्तानं पोंभुर्णा तालुका पदाधिकाऱ्यांनी देवराव भोंगळे यांचा सत्कार केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु. अल्काताई आत्राम, उप-नगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, तालुका महामंत्री ओमदेव पाल, ईश्वर नैताम, माजी पं. स. सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, तुळशीराम रोहणकर, बाळू पिंपळशेडे, गजाजन मडपूवार, नगरसेवक मनू रणदिवे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, मोहन चलाख, दर्शन गोरंटीवार, संजय कोडापे, नगरसेवक,नगरसेविका सौ. श्वेताताई वनकर, सौ. नंदाताई कोटरंगे, सौ. आकाशीताई गेडाम, शारदा गुरनुले,राजेश सुरावार, शैलेंद्र बैस, रोशन ठेंगणे, सुरेश कुळमेथे, गजाजन पिंपळशेंडे, वैभव पिंपळशेडे, अमोल पाल, रणजित पिंपळशेंडे, पंकज वडेट्टीवार, विनोद मारशेट्टीवार, गणपत फरकडे, आदित्य तुंमुलवार, सुगत गेडाम, भारत निमसरकार, अरूण मरसकोल्हे, समिर गौरकार, धनराज पाल, सुनील काटकमवार, श्यामसुंदर नैताम, केशव गेलकीवार, रमेश वेलादी, जनार्धन लेनगुरे, नवनाथ आत्राम, प्रेमदास इस्टाम, शेडमाके, जनार्धन सातपुते, चरण गुरनुले, वैशाली वासलवार, मिना मुलकलवार, ठाकरेंताई, संगीता जिलकुंडावार, आदिंसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. तसेच भारतीय जनता पार्टी, पोंभूर्णाच्या वतीने "'सेवा पंधरवाडा कार्यक्रम' या दरम्यान विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत