Top News

नगर रचना अधिकाऱ्यांकडून बिल्डरला आमंत्रण; शहरात चर्चांना उधाण? #Chandrapur #Korpana #Gadchandur


अतिमहत्त्वाच्या बैठकीला नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची अनुपस्थिती
कोरपना:- गडचांदूर शहराला सन २०१४ ला नगरपरिषदचा दर्जा प्राप्त झाला आहे. तेव्हा पासून गडचांदूर शहराचा ग्रामीणचा दर्जा संतुष्ठात येऊन शहरी दर्जा प्राप्त झाला. व या शहराचा सर्वांगी विकास व्हावा या हेतूने महाराष्ट्र नगरविकास मंत्रालया कडून या शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे कामाला सुरुवात करण्यात आले असून विकास आराखडा तयार करताना हरकती घेण्याची तरतूद नगररचना कायद्यात आहे. त्याचप्रमाणे नियोजन अधिक चांगले होण्यासाठी नागरिकांची मते देखील महत्त्वाची असल्याने सूचना मांडण्याची तरतूद असल्याने जिल्हा नगररचनाकार चंद्रपूर च्या कार्यालया कडून दिनांक 16/9/2022 रोजी
नगर परिषद गडचांदूर ला सूचना देऊन बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तेव्हा या बैठकीला शहरातील प्रमुख नागरिक तसेच नगराध्यक्ष, व सर्व नगरसेवकांना आमंत्रित करणे गरजेचे असताना नगर परिषद कडून केवळ नगरसेवकानाच आमंत्रित करण्यात आले. तेव्हा येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच काही नगरसेवकांना याचे महत्व कळले नाही व ते या महत्वाच्या बैठकीत उपस्थित राहून आपले मत मांडू शकले नाही त्यामुळे आपण आपल्या शहराचा सर्वांगी विकास करावा या उदान्त हेतूने निवडून दिले परंतु ते अनुपस्थित राहून यांना आपल्या शहराच्या विकासा बद्दल किती आपुलकी यावरून आज सिद्ध झाले.
सदर बैठकीला श्री दहिकर साहेब नगररचकार चंद्रपूर व सन्मा.श्री बाल्लमवार साहेब सहाययक नगररचकार यांची प्रामुख्यानी उपस्थित होते. त्यांचे स्वागत श्री अनुप भगत न.प.अभियंता यांनी केले तर संचालन श्री चरनदास शेडमाके (ओएस) यांनी केले. प्रस्ताविक मध्ये प्रारुभ विकास आराखडा बाबत सविस्तर माहिती सहायक नगररचकार श्री बाल्लमवार साहेब यांनी दिली. व या शहरामध्ये कशाची उणीव सर्वात जास्त भासते, कोणत्या वार्डात कशाची उणीव सर्वात जास्त भासते, तुम्हच्या शहरात कुठली गोष्ट तुम्हाला सर्वात महत्वाची वाटते, शहराचे वैशिष्ट काय?, तुम्हच्या शहराची ओळख आज काय आहे आणि पुढील २० वर्षात कशी निर्माण झाली पाहिजे असे तुम्हाला वाटते, शहरात कोणत्या सुविधा उपलब्ध आहे,आठवडी बाजार, मटण मार्केट, एस.टि. स्टॅन्ड येथे वाहनस्थळ उपलब्ध आहे का? शहरात वाहन स्थळ कुठे असणे आवश्यक आहे. वाहन स्थळाची आवश्यकता आहे का? शहरात अपघात स्थळ कोणते, शहरात वाहतूक कोंडी होणारे ठिकाण कोणते, पाण्याचा स्तोत काय, पाण्याची गुणवत्ता कशी आहे. बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, खेळाचे मैदान, दवाखाना, बगीचा, संस्कृतीक केंद्र/धार्मिक/आध्यत्मिक केंद्र, दहनभूमी, अग्निशमन सुविधा या बाबीची माहिती मागविण्यात आली.
यावेळी विरोधी नगरसेवक भाजप पक्ष्याचे श्री अरविंद डोहे, रामसेवक मोरे, शिवसेना नगरसेवक श्री सागर ठाकुरवार, श्री विजय ठाकुरवार, शेख सरवर, सौ. कोडापे नगरसेविका, कांग्रेस पक्ष्याचे गटनेता विक्रम येरने, पपय्याजी पोंनमवार, सौ जयश्री ताकसांडे, सौ वांढरे नगरसेवीका यांनी आपआपले मत मांडले.
यावेळी नगर परिषद कडून नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री भोयर, श्री चरनदास शेडमाके प्रशासकीय अधिकारी व बांधकाम विभागाचे अभियंता अनुप भगत व संतोष गोरे यांची प्रमुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने