कुरखेडात विदर्भस्तरीय स्पर्धा.... #Chandrapur #Cestoball

Bhairav Diwase

सेस्टोबॉल स्पर्धेत चंद्रपूर संघाचा बोलबाला
कुरखेडा:- कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात विदर्भस्तरीय सेस्टोबॉल स्पर्धा घेण्यात आली. यात चंद्रपूर संघाचा बोलबाला होता. सर्व गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या संघांना ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले.
हे ठरले विजेते.

स्पर्धेत सिनियर मुलांच्या गटातून अकोला प्रथम , द्वितीय नागपूर तर तृतीय क्रमांक गडचिरोली संघाने पटकाविला. सिनियर मुलींच्या गटातून प्रथम गोंदिया, द्वितीय नागपूर तर तृतीय क्रमांक चंद्रपूरच्या संघाने पटकाविला. ज्युनियर मुलांच्या गटात प्रथम चंद्रपूर, द्वितीय गडचिरोली तर तृतीय क्रमांक नागपूर संघाने पटकाविला. ज्युनियर मुलींच्या गटात प्रथम चंद्रपूर द्वितीय गडचिरोली तर तृतीय चंद्रपूर ग्रामीण संघाने पटकाविला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य पी. आर. आकरे, सेस्टोबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चांगदेव फाये, प्रद्या-करुणा-शील प्रसारक मंडळाचे सचिव उल्हास महाजन, प्रा. डॉ. दशरथ आदे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. राखी शंभरकर, काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष जावेद शेख, रुग्ण कल्याण समिती सदस्य विवेक निरंकारी, नगरसेवक सागर निरंकारी, पुष्पराज रहांगडाले, सेस्टोबॉल असोसिएशनचे विदर्भ सचिव विजय पवार, पत्रकार सिराज पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सेस्टोबॉल असोसिएशनचे जिल्हा सचिव हरीश बावनथडे यांनी केले. यशस्वीतेसाठी स्वयंसेवकांनी सहकार्य केले.