BREAKING NEWS व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.
👇👇👇👇👇👇
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- सावली (Saoli) तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गेवरा बुज येथील निखिल हिवराज शेरकुरे या २२ वर्षीय युवकाने गावालगतच्या बोडीत गळफास hanging लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
मृतक निखिल हा पुणे (pune) येथील तळेगाव एमआयडीसी मध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता. ११ नोव्हेंबरला सुट्टी (holiday) घेवून तो गेवरा बुज येथील आपल्या घरी आला होता. दोन दिवसांपूर्वी परिसरातील नातेवाइकांना भेटून तो पुन्हा गावात परतला होता व २५ नोव्हेंबरला पुणे येथे जाण्यासाठी त्याने तयारी केली होती. घरी आई-वडीलांसोबत बोलून तो फिरायला जाऊन येतो, असे सांगून बाहेर पडला होता. दरम्यान, गावाबाहेरील बोडीजवळील चिंचेच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या (suicide) केली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोडसह पोलीस कर्मचारी मोहुले, योगेश देशमुख आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत..