चंद्रपूर जिल्ह्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
3
BREAKING NEWS व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.
👇👇👇👇👇👇


बल्लारपूर:- चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावरील सैनिक शाळेच्या समोर असलेल्या भिवकुंड नाल्याच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिरात अज्ञात इसमाने धुडगुस घालुन मूर्तीची विटंबना केली. अज्ञाताने केवळ विटंबनाच केली नसुन मंदिरातील मुर्तीची तोडफोड करून मूर्तीचे तुकडे फेकुन दिल्याचे उघडकीस आले आहे.


सदर घटना रात्रीच्या वेळी घडली असल्याची शक्यता असुन मंदिराची विटंबना झाल्याचे सकाळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. हनुमान मुर्तीची तोडफोड झाल्याचे कळताच लगतच्या विसापूर, चंद्रपूर व बल्लारपूर येथिल हनुमान भक्तांनी तसेच विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन हिंदुंच्या श्रद्धेवर घाला घालणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

3टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा