Top News

जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब #chandrapur

अमन करमनकर यांची दुसऱ्यांना महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री मध्ये निवड


चंद्रपुर:- अपयश म्हणजे संकट नव्हे,आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. अशीच काहीशी म्हण आहे घरची परिस्थिती खूपच बेताची वडील कामगार तर आई गृहिणी अतिशय कष्टानं अमनने आपलं सगळ शिक्षण पूर्ण केलं
कधी कधी गावामध्ये दगड धोंडे तुडवत धावत रोज शाळेत जाणाऱ्या अमन ने अखेर राज्यस्तरीय क्रॉस कंट्री मध्ये सलग दुसऱ्यांदा गवसणी घालत हे यश प्राप्त केलं आहे.

🏥
महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप २०२२-२३ रविवार २५ डिसेंबर २०२२ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे होणार असून सिनिअर गटात अमन करमनकर यांची निवड झाली आहे. तसेच आगामी काळात येणाऱ्या स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवून यश प्राप्त करणार आहे.
🏥

खेळाडुच्या निवडीबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापुरचे प्राचार्य व अथलेटिक्स जिल्हा संघटना चंद्रपूर चे अध्यक्ष मा. डॉ. दिलीप जयस्वाल, अथलेटिक्स जिल्हा संघटना चंद्रपूर चे सचिव, मा. श्री. सुरेश जी अडपेवार सर, श्रीमती.पुर्वा खेरकर, श्रीमती.वर्षा मॅडम, मा. विक्की पेटकर सर, मा. गौतम कदम सर, ओ.एन.जी.सी. (डब्ल्यू. ओ. यु.) कर्मचारी संघटना, पेट्रोलियम संघटना,मित्र परिवार व बामनवाडा, चुनाळा येथील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने