उपसरपंचाने केली महिला सरपंचाला मारहाण; गुन्हा दाखल #chandrapur #mul

Bhairav Diwase
0


मुल:- मुल तालुक्यातील चांदापूर येथील सरपंचा सोनू कालिदास देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणी चांदापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक मार्कंडी मारगोनवार यांचेवर सरपंच देशमुख यांचे तक्रारीवरून मूल पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ मजली आहे.

सरपंच देशमुख यांचे तक्रारीवरून २३ डिसेंबर रोजी ११ वाजता ग्रामपंचायत ची मासिक सभा होती. मासीक सभेला 7 सदस्य उपस्थित होते. विषय क्रमांक 8 नुसार विद्युत साहित्य दर पत्र चालु असतांना उपसरपंच मारगोनवार दुसरेच मुद्दे सभेतच मांडुन भांडु लागला. शिवीगाळ करत धमकी दिली. मासीक सभेला सरपंच देशमुख अध्यक्ष पदी असतांना उपसरपंच मारगोनवार याने सभेतच माझे हात पकडुन गालावर थापड मारली आणि मारहाण केली.

तक्रारीवरून उपसरपंच अशोक मारगोनवार यांचेवर मूल पोलिसांनी अपराध क्रमांक 613 अन्वये भादविचे कलम ३५४, ३५४ A(१)(i), ५०९, २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. उपसरपंच अशोक मारगोनवार यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच सोनु देशमुख यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)