पालकमंत्र्यांच्या अगोदरच खासदार-आमदार दाम्पत्याने केल वॉकींग ट्रकचे भुमिपूजन #chandrapurचंद्रपूर:- जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅंकचे लोकार्पण शासकीय पध्दतीने आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅंक, फुटबाल ग्राऊंड आणि चेंजिंगरुमचे लोकापर्ण आणि वाकींग ट्रॅकचे भूमिपूजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केला आहे.मात्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या येण्याअगोदरच खासदार-आमदार दाम्पत्याने जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे ट्रकच्या भोवती वॉकिग ट्रकचे ४०० मी. बांधकामा करीता मंजूर ५१ लक्ष ३२ हजार रुपयांचे निधीचे भुमिपूजन खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.  खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पालकमंत्र्यांपूर्वी ४०० मी. ट्रॅकचे भूमिपूजन करून या इव्हेंट त्यांनी विरोध केला. 


आज जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटीक ट्रॅंक, फुटबाल ग्राऊंड आणि चेंजिंगरुमचे लोकापर्ण आणि वाकींग ट्रॅकचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकेत या कार्यक्रमाची वेळ ४:३० वाजता दिला होता, परंतु दोन तास होऊन सुद्धा पालकमंत्री कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. आम्हाला सुध्दा अनेक कार्यक्रमाला जायचे असतात. हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम आहे. याला शासनाचा निधी खर्च झाला आहे परंतु पालकमंत्र्यांनी हा कार्यक्रम वैयक्तिक केला असून हा भाजपाचा कार्यक्रम आहे. आमच्या सारख्या लोकप्रतिधींचा अपमानच करणाचा असेल तर अशा कार्यक्रमांना बोलवताच कशाला, अशा शब्दात आ. धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत