सुगंधित तंबाखूसह दोघांना अटक #chandrapur #Korpana #arrested



कोरपना:- आंध्र प्रदेशच्या टोकावर असलेला कोरपना पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने कन्हाळगाव फाटा येथे विना क्रमांकाच्या वाहनातून सुगंधित तंबाखू जप्त करून दोघांना केली. अटक केली.

पोलीस वाहतूक नियंत्रित करीत असताना आलेल्या विना क्रमांकाच्या संशयास्पद वाहनाचा पाठलाग करून त्या वाहनाला कान्हाळगाव फाटा येथे थांबविले. या वाहनाची झडती घेतली असता, वाहनात सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी वाहन आणि सुगंधित तंबाखू असा एकूण १ लाख ९ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आकाश चंदू लबाने व अर्जून कवडू येटे रा. वडजापूर (वणी) या दोघांना अटक करून त्यांच्या विरोधात भादंवि कलम ३२८, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस हवालदार प्रभाकर जाधव, पोलीस नाईक नामदेव पवार, शिपाई बलविंदसिंग यादव यांनी केली. पुढील तपास कोरपण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत