"त्या" उर्मट व दलित विरोधाभास असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पदमुक्त करत ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाही करा #chandrapur #Korpana #Gadchandur


पीडित दलित परिवाराचे पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन


कोरपना:- शहरातील दलित रामटेके परिवाराने रोज गुरुवारला चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांची भेट घेत त्यांना घडलेल्या आपबिती बाबत सांगत त्या उर्मट पोलीस कर्मचाऱ्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून निलंबित करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे आहे की भद्रावती येथिल दोन पोलिस कर्मचारी जुन्या एका प्रेम प्रकरणात ( स्थानिक उच्च अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ) कथित अटक वॉरंट असलेल्या मुकेश रामटेके नामक आरोपीला पकडण्याकरिता गडचांदूर इथे आले होते. त्यांनी आरोपीच्या घरी धडक मारत कुठल्याही प्रकारची शहनिषा न करता आरोपीच्या संपूर्ण दलीत परिवाराला इतकेच नाही तर परिवारातील लहान मुलाना धारेवर धरत घराच्या बाहेर रस्त्यावर आणून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तसेच संबंधित आरोपीच्या भावाला काहीही कारण नसताना जबरदस्ती त्यांच्या गाडीत बसवत कवठाळा इथे दमदाटी करत नेले व या बाबतीत कुठेही बोलबाला न करण्याबाबत धमकाविले असे पीडित व्यक्तीचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर संपूर्ण कुटुंबावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कारवाई करत 14 वर्षाची जेलवारी घडवण्याची धमकी दिल्ली होती. व यात त्या दलित कुटुंबावर अन्याय करणाऱ्या विशाल मुळे नामक पोलीस कर्मचाऱ्याला गडचांदूर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी साथ दिली होती.

त्या पोलीस कर्मचाऱ्याबाबत तक्रार दाखल करण्याकरिता गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गेले असता चार ते पाच तास थांबवून आमची कसल्याही प्रकारची तक्रार घेतली नाही, असा आरोप रामटेके परिवारांनी निवेदनात केला आहे.
संपूर्ण समाजासमोर दलीत कुटुंबाला, घरातील लहान अज्ञान बालकांना सुध्दा अमानुषपणे मारहाण करत जातीवाचक व गलिच्छ शिवीगाळ केली आहे. त्यामुळे उर्मट पोलीस कर्मचारी विशाल मुळे ला व त्यांचा साथ देणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशा आशयाचे निवेदन रामटेके परिवाराने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना दिले आहे.

सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी तात्काळ विशाल मुळे नामक पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यासंबंधीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देत 24 तासात कारवाई करण्याचे विनंती केली आहे, अन्यथा पीडित कुटुंबासह सर्वपक्षीय आमरण उपोषण करण्यात येईल, व होणाऱ्या परिस्थितीस आपण स्वतः जबाबदार रहाल असा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत