Chandrapur murder News: चंद्रपूर जिल्ह्यात तरुणाचा खून

Bhairav Diwase

कोरपना:- भरदिवसा तरुणाचा खून झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील बिबी गावात आज गुरूवारी घडली. शिवराज उर्फ शिवा पांडुरंग जाधव असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह गावातील कब्रस्तान रोडवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्थानिक शेतकऱ्यांना आढळला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली. या युवकाचा खून सराईत गुन्हेगारानी केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मृत युवकाचा लहान भावा सोबत काही दिवसापूर्वी वाद होता. त्याचा राग धरून हा खून केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्यांनी अनेक गुन्हे केले असल्याची माहिती आहे.

अनेक वर्षापासून वर्डामध्ये दहशत मजविण्याचा प्रयत्न आरोपीकडून होत असल्याची माहिती आहे. पुढील तपास पी आय कदम यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पिंपळकर, पोलीस शिपाई तिरुपती माने, संदीप थेरे, संदीप अडकिने, इस्वर देवकते करीत आहे.