पोंभुर्णा:- तालुक्यातील चेक ठाणेवासना गावात एक 'जीबीएस'चा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. चेक ठाणेवासना येथील १२ वर्षीय मुलगी या आजाराच्या विळख्यात सापडली आहे.
तिच्यावर नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील अतिदक्षता विभागात मागील महिन्याभरापासून उपचार सुरू आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या आजाराची ओळख महिन्याभरापूर्वीच आरोग्य यंत्रणेला झाली असतांना सुद्धा या गंभीर आजाराबद्दल दखल का घेतल्या गेली नाही, असा सवाल आता उपस्थित केल्या जात आहे.
राज्यातील अनेक GBS patients जिल्ह्यात गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत राज्यात १६९ रुग्ण बाधीत असल्याची माहिती आहे. याचे लोन आता पोंभुर्णा तालुक्यातही पसरले आहेत. अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी, स्नायूवर हल्ला करीत असल्याने हातापायातील ताकद जाऊन अंग लुळे पडण्याची लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.
पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीत शिकणारी साक्षी सचिन गौरकार (१२) हिची १ जानेवारीला अचानक प्रकृती बिघडली. प्रकृती अधिक खालावल्याने तिला ४ जानेवारीला पोंभूर्णा येथे नेण्यात आले. मात्र, तिथून चंद्रपूर व नंतर नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. रक्त तपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याचा अहवाल घेऊन जीबीएसची तपासणी केली असता, गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले.
उपाययोजना म्हणून अन्य गावातही तपासण्या सुरू:- डॉ. मामीडवार
१२ वर्षीय GBS patients साक्षीला जीबीएसची लागण झाल्याचे निष्पन्न होताच उपाययोजना व सतर्कता म्हणून तात्काळ आम्ही चेक ठाणेवासना, दिघोरी, गंगापूर, नवेगाव मोरे येथील नागरिकांच्या रक्ताचे व पाणी तपासण्या केल्या आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे लक्षण इतरांमध्ये आढळून आलेले नाहीत. बाकीच्या गावातही तपासण्या केल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया पोंभुर्णा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी दिली.