Top News

आम आदमी पार्टीचा विधान भवनावर धडकला मोर्चा #nagpur


राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार भरपाई द्या ! आपची मागणी


नागपूर:- महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते यशवंत स्टेडियम येथे जमा होऊन या ठिकाणावरून दुपारी एक वाजताच्या सुमारास विधान भवनावर धडकले.पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला.


मोर्चात सहभागी आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्या मांडल्या.मोर्चातील शिष्टमंडळाने उद्योगमंत्री उदय सामंत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनातील मागण्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.या ठिकाणी आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे दीपक सिंगला यांनी मोर्चाला संबोधित केले यानंतर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच व सदस्य म्हणून निवड झालेल्या आम आदमी पार्टीच्या नवनिर्वाचित त्यांची शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे,महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंगला,विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे,राज्य संघटन मंत्री विजय कुंभार,राज्य सचिव धनंजय शिंदे, राज्य सहसंयोजक धनराज वंजारी,भाई अमन पश्चिम विदर्भ सह संयोजक,कुसुमाकर कौशिक,अन्सार शेख,डाॅ.गणेश नाईक,वसंतराव ढोके यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चावर धडकले.

आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्या,पीक विमा कंपनीला सरसकट पीक विमा देणे बंधनकारक करावे,शेतमजुरांना रोहयो अंतर्गत काम द्यावे,उसाची एफआरपी वाढवून ठरविलेली एफआरपी एकरकमी देण्याचा जीआर काढावा,कापसाला प्रती क्विंटल १० हजार भाव देऊन निर्यात वाढवावी,शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करून थकीत बिल माफ करावे,यासह विविध मागण्यांचा मोर्चा विधानभवनावर धडकला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने