Top News

मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर अस्वलाचा हल्ला #chandrapur


सिंदेवाही:- मॉर्निंग वाकला गेलेल्या एकावर पिल्लासह असलेल्या एका अस्वलाने हल्ला केला. यात ती व्यक्ती जखमी झाली आहे. ही घटना सिंदेवाही शहराजवळील रेल्वेस्टेशन-जिटीसी रोड परिसरात दिनांक १५ ) सकाळी सहाच्या सुमारास घडली. नंदू सिताराम शेंडे (५०)असे अस्वलाचा हल्ल्‍यात जखमी झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे.


सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी नेहमी प्रमाणे नंदू शेंडे मॉर्निंग वाॅकला गेले होते. सिंदेवाही शहराजवळील रेल्वे स्टेशन-जीटीसी रोड परिसरात अचानक त्यांच्या समोर अस्वल आले. त्याने शेंडेवर हल्ला केला. त्यांच्या डोळे, नाक आणि डाव्या कुशीत गंभीर दुखापत झाली आहे. त्‍यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचाराकरीता हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी शसालकर यांच्या नेतृत्वात वनविभाग करीत आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने