समाजकल्याण वसतिगृहात होतोय निकृष्ट भाजीपाल्याचा पुरवठा #chandrapur #Rajuraराजुरा:- समाजकल्याण वसतिगृह राजुरा येथे निकृष्ट दर्जाचा भाजीपाला पुरवठा करण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होत आहे. १४ डिसेंबर २०२२ ला ठेकेदारांनी भाजीपाला आणून दिला. हा भाजीपाला निकृष्ट दर्जाचा आहे, फुलगोबीला बुरशी चढली आहे, वांगे सडलेले आहे, हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. अनेक दिवसांपासून हीच परिस्थिती आहे.

ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजे. आणि समाजात मानसन्मान मिळाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासनाने वसतिगृह सुरू केली. मात्र सोयीसुविधा दिल्या नाहीत. मागील दोन वर्षांपासून समाजकल्याण विभागाने ठेकेदार यांना पैसे दिलेले नाही. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता दिला जात नसल्याचेही विद्यार्थी सांगतात. समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे.

दि. 14 डिसेंबर ला पुरवठादार यांचे कडून खराब फुलकोबी चा पुरवठा झाल्याचे लक्षात आले. तेव्हाच ते साहित्य संबंधित पुरवठादाराला फेकून द्यायला लावून दुसरा भाजीपाला पुरविला. संबंधित पूर्वठादाराला तशी ताकीद दिली असून यानंतर अशी चूक केल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले. आता सर्व सुरळीत आहे.
 श्री. वाय. डब्ल्यू. धोडरे , गृहपाल, 
शासकीय वसतिगृह, राजुरा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत