Top News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं #chandrapur #Mumbai #Maharashtra #shivsena

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई:- शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय.

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.

The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction. pic.twitter.com/cyzIZCm8sh

— ANI (@ANI) February 17, 2023

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने