Top News

अन् 'ते' स्वत:च्या पायावर चालू लागले! #Chandrapur


विनोद थेरे यांनी मानले ना. सुधीर मुनगंटीवारांचे आभार


चंद्रपूर:- अचानक पायाने चालता येणे थांबले. घरचा कर्ता पुरुषच हतबल झाला तर कुटुंबाची काय अवस्था होते. हे समजण्यासारखे आहे. अनेक दवाखाने केले. काहीही उपयोग झाला नाही. आहे त्या परिस्थितीशी झुंज देण्यापलीकडे काहीच उरले नव्हते. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी खर्च उचलून मुंबईतील एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये पायावर शस्त्रक्रिया केली. यानंतर तो व्यक्ती स्वतःच्या पायाने चालतो. विनोद थेरे असे या व्यक्तीचे नाव आहे.


विनोद थेरे हे चंद्रपूर तालुक्यातील वढोली येथील रहिवासी आहेत. थेरे यांना पायाने चालता येणे बंद झाले. दोन वर्ष उपचारात गेले. अखेर डॉक्टरांनी हिपबॉल प्लेसमेंटचा सल्ला दिला. यासाठी लागणारा खर्च आवाक्याबाहेरचा होता. रामपाल सिंह यांनी ही बाब ना. सुधीर मुनगंटीवार यांना कानावर टाकले. त्यांनी मुंबईला उपचारासाठी हालचाली केल्या. अखेर मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयात उपचार झाले. उपचाराअंती पायावर उभे होऊ चालता येऊ लागल्याने त्यांच्या जीवात जीव आला.

माझे पाय निकामी झाले होते. चंद्रपुरात दोन वर्षे उपचार केले. पण उपयोग झाला नाही. शेवटी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी पुढाकार घेतल्याने मुंबईतील पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. आता मला कुठल्याही आधाराशिवाय चालू शकतो. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
विनोद थेरे, वढोली, जिल्हा. चंद्रपूर.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने