दोन मुले जखमी; घटनेनंतर ट्रकचालक फरार
चंद्रपूर:- पत्नी व आपल्या दोन मुलांना घेऊन स्कुटीने घुग्घूसकडे येत असताना ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात स्कुटीवरील दोन मुले जखमी झाले. ही घटना घुग्घूस-चंद्रपूर मार्गावरील एका वाईन बारसमोर गुरुवारी सकाळी १० वाजता घडली.
जखमी मुलांची नावे विष्णू व अवंती अशी आहेत. चंदूसिंह सावळे (रा. चामोर्शी जि. गडचिरोली) हल्ली मुक्काम चंद्रपूर हे आपल्या पत्नी व दोन मुलांसोबत स्कुटीने (एमएच ३४ एबी ९६४५) काही कामासाठी घुग्घुसकडे जात होते. दरम्यान, ट्रकने (एमएच ३४ एबी ९६४३) त्यांच्या स्कुटीला मागून घडक दिली.
यात दुचाकी खाली पडून दुचाकीवरील दोन्ही मुले जखमी झाली. जखमींना घुग्घुसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला. घटनेचा अधिक तपास घुग्घूस पोलिस पुढील करीत आहेत.